घरातील मातीची भांडी चमकवण्यासाठी खास उपाय करुन पाहा.
आपल्या घरातही मातीची भांडी असतील तर त्यांना चकमवण्यासाठी काही घरगुती उपाय करुन पाहा.
मातीचे भांडे चमकवण्यासाठी गरम पाण्यात बेकिंग सोडा घालून १० मिनिटे ठेवा.
मातीची भांडी स्वच्छ करण्यासाठी लिंबाच्या सालीला मीठ लावून ठेवल्याने ती स्वच्छ होतात आणि चमकतात.
मातीच्या भांड्यातील दुर्गंध दूर करण्यासाठी त्याला व्हिनेगरमध्ये भिजवा आणि नंतर लिंबाच्या रसाने स्वच्छ करा.
त्याचा वास कमी करण्यासाठी आणि नव्यासारखे दिसण्यासाठी सँडपेपरने हलके घासून बेकिंग पावडर आणि लिंबाच्या रसाच्या मिश्रणाने स्वच्छ करा.
मातीच्या भांड्यांसाठी साबण किंवा डिटर्डंट वापरु नका. यामुळे अन्नाची चव खराब होऊ शकते.
मातीचे भांडे वापरल्यानंतर ते उन्हात वाळवा आणि नंतर कापडाने स्वच्छ करा. ज्यामुळे बुरशी लागणार नाही.
मसाल्यांचे डाग काढण्यासाठी बेकिंग सोडा आणि मीठ चोळून स्वच्छ करा.