भेसळयुक्त आईस्क्रीम कसं ओळखायचं?

ऊन, वारा, पाऊस...कोणताही ऋतू असो, गारेगार आईस्क्रीम खाणाऱ्यांची कमी नाही, पण ते भेसळयुक्त नाही ना, हे तपासून घ्या!

तुम्ही म्हणाल, आईस्क्रीम खाताना कोण एवढा विचार करतं? पण हाच विचार बदलून आपल्याला आरोग्य जपायचे आहे आणि आनंदही!

आईस्क्रीम हे बालपणीपासून आपले पहिले प्रेम, आता डाएटवर असणारे लोकही हेल्दी आईस्क्रीमचा पर्याय शोधतात, पण आईस्क्रीम खातात. 

मात्र, तुम्ही बाजारात मिळणारे कोणत्याही ब्रँडेड कंपनीचे आईस्क्रीम खात असाल तर ते भेसळयुक्त आहे की नाही याची तपासणी करून घ्या. 

बाजारात मिळणारी प्रत्येक वस्तू शुद्ध असेल असे नाही, त्यामुळे डोळे बंद करून त्याचे सेवन करण्यापेक्षा त्याची शुद्धता तपासा आणि मग त्याचा आस्वाद घ्या!

आईस्क्रीमची शुद्धता कळते ती FSSAI वरून, पदार्थांची शुद्धता तपासून त्याला स्वीकृती देणारी ही भारतीय खाद्यपदार्थ तपासणारी संस्था आहे. 

आईस्क्रीमच्या डब्यावर किंवा आवरणावर हा मार्क असतोच असतो, यावरून त्याची चाचणी झाली आहे की नाही हे लक्षात येते. 

याबरोबरच आईस्क्रीमचा सविस्तर तपशील यात मिळतो, जसे की फ्लेवर, रंग, वजन, समाविष्ट पदार्थ याची यादी असते. 

आईस्क्रीम कमी तपमानात स्टोअर केले जाते, मात्र बाहेर काढल्यावर ते पटकन वितळत असेल तर ते भेसळयुक्त असू शकते. 

आईस्क्रीमचा रंग बघूनही तुम्हाला त्याची कृत्रिमता लक्षात येऊ शकते, भेसळयुक्त रंग हाताला लागतो. 

आईस्क्रीम तपासणी करायची असेल तर एका वाटीत आईस्क्रीम स्कुप घेऊन त्यावर लिंबाच्या रसाचे काही थेम्ब टाका, फेस आला तर ते भेसळयुक्त समजा. 

आईस्क्रीम विकत घेताना त्याची एक्सपायरी डेट कायम तपासून घ्या, मगच खरेदी करा, अन्यथा अन्नातून विषबाधा होऊ शकते. 

तर पुढच्या वेळी या गोष्टी तुम्हीही तपासून घ्या आणि मर्यादित प्रमाणात आईस्क्रीम खा आणि मनसोक्त आनंद लुटा!

Click Here

Your Page!