२ रुपयांची कॉफी करेल ओठ गुलाबी! 

कॉफीच्या मदतीने आपण ओठांची काळजी घेऊ शकतो. 

ऋतू कोणताही असला तरी आपले ओठ फाटणे किंवा कोरडे पडण्याच्या समस्येला आपल्याला सामोरे जावे लागते. 

बाजारात मिळणाऱ्या लिप बाममध्ये रसायनांचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे ओठांना नुकसान होते. परंतु, कॉफीच्या मदतीने आपण ओठांची काळजी घेऊ शकतो. 

एका बाऊलमध्ये खोबरऱ्याचे तेल आणि मेण वितळवा. त्यात कॉफी पावडर आणि मध मिसळा. थंड होण्यापूर्वी डब्यात भरा. 

नारळाचे तेल आणि मध ओठांना खोलवर मॉइश्चरायझ करते. त्याचा वापर ओठांना भेगा पडण्यापासून थांबवतो. 

कॉफीमध्ये असलेले घटक ओठांवरील मृत त्वचा काढून टाकतात. ज्यामुळे ओठ निरोगी आणि चमकदार राहतात. 

कॉफी लिप बाम लावल्याने ओठांचा रंग सुधारतो. याच्या मदतीने ओठ नैसर्गिकरित्या मऊ आणि गुलाबी राहतात. 

सतत केमिकल्सच्या वापरामुळे ओठ काळे पडतात. कॉफी आणि मधाचे मिश्रण ओठांचा काळेपणा हळूहळू कमी करते. 

ओठांवर रासायनिक उत्पादने वापरण्याऐवजी नैसर्गिक कॉफी लिप बाम वापरल्यास फायदा होईल. 

Click Here