उन्हाळ्यात चेहऱ्यावर कोरफडीचा गर कसा वापराल?

उन्हाळ्यात त्वचेवर कोरफडीचा गर कधी लावायला हवा, जाणून घेऊया. 

कोरफडीचा गर त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. उन्हाळ्यात आपल्या त्वचेला थंडावा देण्याचे काम करते.

कोरफड त्वचेला हायड्रेट करते. तसेच त्वचेला होणारी जळजळ कमी करते. उन्हाळ्यात त्वचेवर कोरफडीचा गर कधी लावायला हवा, जाणून घेऊया. 

उन्हाळ्यात बाहेरुन आल्यानंतर चेहऱ्याला थंडावा देण्यासाठी आपण कोरफडीच्या गराचा वापर करु शकतो. यामुळे त्वचेची चमक वाढेल. 

या ऋतूमध्ये आपण कोरफडीच्या गराचा बर्फ तयार करुन चेहऱ्यावर लावू शकतो. ज्यामुळे त्वचेवरील पुरळ, टॅनिंग कमी होण्यास मदत होईल. 

आपली त्वचा दिवसभर हायड्रेट आणि चमकदार ठेवायची असेल तर सकाळी चेहऱ्यावर कोरफडीचा गर लावू शकता. 

रात्री झोपताना चेहऱ्यावर कोरफड लावा. यामुळे त्वचा दुरुस्त होईल, डाग हलके होण्यास मदत होईल. 

उन्हाळ्यात तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेची चमक कमी होते. हे टाळण्यासाठी आपण त्वचेला नियमितपणे कोरफडीचा गर लावायला हवा. 

चेहऱ्याला ताज्या कोरफडीचा गर लावा. हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करा. काही दिवसात फरक जाणवेल. 

सकाळी, बाहेरुन आल्यानंतर किंवा रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर कोरफडीचा गर लावा. ज्यामुळे त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते. 

Click Here