रात्री मुलांची झोप व्यवस्थित व्हावी यासाठी अनेकदा स्त्रिया बाळाला डायपर घालतात.
लहान मुलांना डायपर घालणं हे आता कॉमन झालं आहे. अगदी नवजात बाळापासून ३-४ वर्षाच्या मुलांपर्यंत सहज डायपर वापरले जातात.
प्रवासात मुलांना त्रास होऊ नये किंवा रात्री मुलांची झोप व्यवस्थित व्हावी यासाठी अनेकदा स्त्रिया बाळाला डायपर घालतात. परंतु, हे डायपर नेमकं किती तासांनी चेंज करावं ते जाणून घेऊयात.
डॉक्टर निहार पारेख यांच्यामते, दर ३ ते ४ तासांनी डायपर चेंज करायला हवा. नाही तर मुलांना रॅशेजची समस्या होते.
बाळाची त्वचा खूप नाजूक असते. यात ओलं डायपर तसंच ठेवलं तर बाळाच्या त्वचेसोबत त्याचं घर्षण होतं. ज्यामुळे मुलांना इंफेक्शन होऊ शकतं.