डायमंडचे किती प्रकार असतात माहितीये का?

लॅबमध्ये तयार केलेले डायमंड नैसर्गिकरित्या तयार केलेल्या डायमंडच्या तुलनेत सहज उपलब्ध होतात

स्त्रियांकडे कितीही दागिने असले तरीदेखील आपल्या दागिण्यांच्या कलेक्शनमध्ये एक तरी दागिना हिऱ्याचा असावा असं प्रत्येक स्त्रिला वाटतंच.

अनेक स्त्रिया हिऱ्याचे हार किंवा हिऱ्याची अंगठी वापरतात. परंतु, हिरे अर्थात डायमंडचे किती प्रकार असतात हे तुम्हाला माहितीये का?

डायमंड मुख्यत: नैसर्गिकरित्या तयार झालेले आणि लॅबमध्ये तयार केलेले असे दोन प्रकारचे असतात. परंतु, नैसर्गिकरित्या तयार झालेले डायमंड मिळणं फार कठीण आणि खर्चिक आहे.

लॅबमध्ये तयार केलेले डायमंड नैसर्गिकरित्या तयार केलेल्या डायमंडच्या तुलनेत सहज उपलब्ध होतात. परंतु, त्याचे अनेक प्रकार आहेत.

 नैसर्गिकरित्या तयार झालेले खरे हिरे टाइप IA मध्ये येतात. हे हिरे पिवळसर रंगाचे असतात. तर, टाइप IB मधील हिऱ्यांमध्ये नायट्रोजनचं प्रमाण जास्त असल्यामुळे ते गडद पिवळ्या रंगाचे दिसतात.

सर्वात शुद्ध आणि महागडे हिरे हे टाइप IIa या प्रकारात येतात. कोहिनूर सारखे जगप्रसिद्ध हिरे या प्रकारात मोडतात. हे हिरे अत्यंत पारदर्शी आणि दुर्मिळ असतात.

हे हिरे निळ्या किंवा राखाडी रंगाचे असतात. हा हिरादेखील मिळणं दुर्मिळ आहे. 

अंतराळात महिला अंतराळवीर पिरिअड्ससोबत कसं डील करतात?

Click Here