आयुष्यात ‘इतक्या’ वेळा साडेसाती येतेच!

शनी साडेसाती हा अनन्यसाधारण महत्त्व असणारा योग आहे.

साडेसाती सुरू होणार असल्याचे समजते, तेव्हा जणू काही संकट ओढावणार आहे, असा आपला समज होतो.

साडेसाती ही एक प्रक्रिया आहे. साडेसाती केव्हा येते, ते पाहणे गरजेचे आहे. साडेसातीला अनन्यसाधारण महत्त्व असते.

साडेसातीचा विचार हा जन्मकुंडलीतील चंद्र व गोचरी शनि यांच्याशी निगडित आहे. 

चंद्रापासून ४५ अंश मागे शनिचे अंशात्मक भ्रमण सुरू होते, तेव्हा साडेसाती सुरू होते व चंद्रापासून ४५ अंशापुढे शनी गेला की साडेसाती संपते.

सर्वसाधारण जन्मकुंडलीतील चंद्राच्या बाराव्या राशीत शनिने प्रवेश केला की, साडेसाती सुरू होते. ही पहिली अडीच वर्षे असतात. 

चंद्रराशीवरून शनिचे भ्रमण सुरू झाले की, दुसरी अडीच वर्षे व चंद्राच्या दुसऱ्या राशीत शनिने प्रवेश केला की, तिसरी अडीच वर्षे सुरू होतात. 

असा हा सर्व मिळून साडेसात वर्षांचा काळ म्हणून यास साडेसाती असे म्हणतात. सध्या कुंभ, मीन आणि मेष राशीची साडेसाती सुरू आहे.

एका मनुष्याच्या आयुष्याचा सर्वसाधारण विचार केल्यास तीन वेळा साडेसाती येते, असे म्हटले जाते. काही जणांना जन्मी साडेसाती असते.

एखाद्या व्यक्तींच्या जन्म वेळेपासूनच साडेसाती सुरू असली आणि अशी व्यक्ती ९० वर्षांपर्यंत जगली, तर ४ वेळा साडेसाती येऊ शकते.

साधारणपणे ३० वर्षांनी एकदा साडेसाती येते. ज्यांच्यावर पालकांचे छत्र आहे, त्यांना साडेसातीचा त्रास कमी होतो, असे म्हटले जाते. 

तसेच लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक झालेल्या व्यक्तींना साडेसातीचा त्रास होत नाही, असे सांगितले जाते. 

सदर माहिती सामान्य गृहीतके, ज्योतिषीय मान्यतांवर आधारित आहे. यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल.

Click Here