भारतीय चलनी नोटेवर किती भाषा आहेत?

नोटांच्या पुढच्या आणि मागच्या दोन्ही बाजूंना या भाषा छापलेल्या असतात.

भारतात अनेक भाषा बोलल्या जातात. पण तुम्हाला माहिती आहे का की भारतीय संविधानात कोणत्याही भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा देण्यात आलेला नाही.

परंतु, देवनागरी आणि इंग्रजी यांना अधिकारीक भाषा म्हणून घोषित करण्यात आले आहे.

भारतीय चलनी नोटांवर लिहिलेल्या अनेक भाषा तुम्ही पाहिल्या असतील. नोटांच्या पुढच्या आणि मागच्या दोन्ही बाजूंना या भाषा छापलेल्या असतात.

रिझर्व्ह बँकेच्या मते, नोटेवर १७ भाषा छापलेल्या आहेत. नोटेच्या पुढच्या बाजूला देवनागरी आणि इंग्रजी या दोन भाषा आहेत.

याशिवाय, नोटेच्या मागच्या बाजूला अनेक भाषा देखील छापलेल्या असतात. तुम्हाला माहिती आहे का मागच्या बाजूला किती भाषा छापलेल्या असतात?

भारतीय चलनी नोटेच्या मागील बाजूस एकूण १५ भाषा छापलेल्या असतात.

या १५ भाषांमध्ये आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, काश्मिरी, कोकणी, मल्याळम, मराठी, नेपाळी, उडिया, पंजाबी, संस्कृत, तमिळ, तेलगू आणि उर्दू यांचा समावेश आहे.

चित्रांबद्दल बोलायचे झाले तर, नोटाबंदीनंतर जारी केलेल्या ५०० रुपयांच्या नवीन नोटेवर लाल किल्ल्याचे चित्र छापलेले आहे.

२०० रुपयांच्या नोटेवर सांची स्तूप छापलेला आहे. जुन्या ५० रुपयांच्या नोटेच्या मागील बाजूस संसद भवनाचे चित्र छापलेले होते.

पण, नवीन नोटेच्या मागे हंपीचा फोटो छापलेला आहे. २० रुपयांच्या नोटेच्या मागे वेरूळच्या लेण्या छापलेल्या आहेत आणि १० रुपयांच्या नोटेच्या मागे कोणार्क मंदिर छापलेले आहे.

Click Here