मुलांनी किती तास झोपायला हवे? 

मुलांच्या वाढीसाठी झोप किती महत्त्वाची आहे जाणून घ्या. 

मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी योग्य झोप खूप महत्त्वाची आहे. 

नवजात बाळांनी दिवस आणि रात्री मिळून सुमारे १४ ते १७ तास झोपावे. 

चार ते अकरा महिन्यांच्या बाळांना सुमारे १२ ते १५ तासांची झोप आवश्यक असते. 

एक ते दोन वर्षांच्या मुलांनी ११ ते १४ तास झोप घ्यायला हवी. 

तीन ते पाच वर्षे वयोगटातील मुलांनी सुमारे १० ते १३ तास झोप घेतली पाहिजे. 

मुलांनी पुरेशा प्रमाणात झोप घेतली तर त्यांची बुद्धी विकसित होण्यास मदत होते. 

Click Here