ITR रिफंड किती दिवसात खात्यात जमा होईल?


आयकर रिटर्न भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. १५ सप्टेंबर २०२५ शेवटची तारीख आहे.

आयकर रिटर्न भरण्याचा हंगाम सुरू आहे. आयटीआर भरण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर २०२५ निश्चित करण्यात आली आहे. गेल्या वर्षी शेवटची तारीख ३१ जुलै होती. 


आयकर विभागाच्या मते, १ जुलैपर्यंत ७५.१८ लाखांहून अधिक आयटीआर भरले गेले आहेत, त्यापैकी ७१ लाखांहून अधिक आयटीआर पडताळले गेले आहेत. 

आता प्रश्न असा निर्माण होतो की, आयकर परतावा कधी मिळेल? ५ दिवसांनी, १० दिवसांनी की १५ दिवसांनी? चला याचे उत्तर जाणून घेऊया....

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अलीकडेच माहिती दिली की, आयकर विभाग सरासरी १० दिवसांत आयटीआर परतावा देत आहे. हे ऑटोमेशन आणि सिस्टम अपग्रेडचे परिणाम आहे.

फक्त आयटीआर दाखल करणे पुरेसे नाही. जोपर्यंत तुम्ही ते ई-व्हेरिफाय करत नाही तोपर्यंत तुमची फाइल प्रोसेस केली जाणार नाही आणि परतावा देखील दिला जाणार नाही. 


आयटीआर पडताळण्याचे मार्ग: आधार ओटीपी, नेट बँकिंग, डीमॅट खाते ,ई-व्हेरिफिकेशन कोड (ईव्हीसी). ऑनलाइन पडताळणी जलद होते, तर ऑफलाइनला विलंब होऊ शकते.


परताव्यास विलंब होण्याची कारणे- ई-व्हेरिफिकेशन न करणे, पॅन आणि आधार लिंक नसणे, टीडीएस तपशीलांमध्ये त्रुटी, चुकीचे बँक तपशील, विभागीय सूचनेला उत्तर न देणे.


वेळेवर परतफेडीसाठी या गोष्टी नक्की तपासा- पॅन आणि आधार लिंक केलेले असावेत, योग्य बँक खाते आणि IFSC कोड भरा, फॉर्म १६ आणि फॉर्म २६AS शी TDS जुळवा.

Click Here

Your Page!