बऱ्याच जणांना वारंवार चहा पिण्याची सवय असते, ते आरोग्यासाठी कितपत योग्य जाणून घ्या
अनेकांच्या दिवसाची सुरुवात आलं अन् वेलची घालून बनवलेल्या कडक चहाशिवाय सुरू होत नाही.
चहा प्यायल्यानंतर त्यांना ताजेतवाने वाटते आणि चहा हा त्यांचा दैनंदिन क्रम सुरू करण्याचा एक मार्ग आहे.
काही लोक सकाळी आणि संध्याकाळी चहा पितात पण काही लोक दिवसभर थोड्या थोड्या अंतराने चहा पित राहतात.
सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकर यांनी दिवसातून किती वेळा चहा प्यावा हे एका मुलाखतीत स्पष्ट केले आहे.
सकाळी रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी न पिण्याचा सल्ला देतात. झोपेत अडथळा येऊ नये म्हणून दुपारी ४ नंतर चहा पिणे योग्य नाही
चहामध्ये कॅफिन असते, जे मज्जासंस्थेला उत्तेजित करते आणि शरीराला झोपेचे संकेत देणाऱ्या हार्मोन मेलाटोनिनच्या रिलीज होण्यास विलंब करते.
बरेच लोक भूक लागल्यावर काहीतरी खाण्याऐवजी चहा पिणे पसंत करतात, परंतु असे करू नका. त्यातून शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळत नाहीत.