आंबे खायला आवडतात... पण लगेचच पिऊ नका पाणी, ‘हे’ आहे कारण
आंबे घ्यायला सर्वांनाच आवडतं. काही जण तर खास आंब्याच्या सीझनची आतुरतेने वाट पाहत असतात.
आंबा खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नये असा सल्ला नेहमीच मुलांना दिला जातो.
आंब्यावर पाणी प्यायल्याने पोटदुखी, एसिडिटीसारखा पोटासंबंधीत त्रास होतो. त्यामुळे आंबे खाताना जरा जपून राहा.
आंबा खाल्ल्यानंतर जवळपास अर्ध्या तास किंवा एक तास अजिबात पाणी पिऊ नका.
आंब्यावर लगेचच पाणी प्यायल्याने पोटात एसिडचं प्रमाण वाढतं आणि पचनावरही परिणाम होतो.