ब्रेकअप करायचंय पण पार्टनरला सांगता येत नाहीये?

आज असे अनेक कपल्स आहेत जे टॉक्सिक रिलेशनशीपमध्ये राहतायेत.

प्रत्येक नात्यात चढउतार हे येतच असतात. मात्र, काही नात्यांमध्ये एकाच व्यक्तीवर शारीरिक, मानसिक आघात वारंवार होत असतात. त्यामुळे अशा नात्यातून बाहेर पडणं कधीही योग्य.

आज असे अनेक कपल्स आहेत जे टॉक्सिक रिलेशनशीपमध्ये राहतायेत. परंतु, या नात्यातून बाहेर कसं पडायचं हे त्यांना कळत नाही. म्हणूनच, जर तुम्हाला ब्रेकअप करायचा असेल तर पार्टनरला ते कसं सांगायचं पाहुयात.

जर तुम्हाला ब्रेकअप करायचा आहे तर कधीही पब्लिकली या विषयी बोलू नका. कारण, बऱ्याचदा पार्टनर ओव्हर रिअॅक्ट होऊ शकतो. त्यापेक्षा एकांतामध्ये तुम्ही पार्टनरला तुमची समस्या सांगा. ज्यामुळे तो समजू शकेल.

ब्रेकअप करतांना कधीही वादविवाद करु नका. त्यापेक्षा खरंच तुम्हाला मनापासून काय वाटतंय, या नात्यातून का बाहेर पडायचंय हे स्पष्टपणे सांगा.

भांडण करुन किंवा पार्टनरला बेईज्जत करुन कधीच ब्रेकअप करु नका. कारण, ब्रेकअपपूर्वी हीच व्यक्ती तुमच्यासाठी खास होती. त्यामुळे तुमच्या अशा अचानक वागण्यामुळे समोरच्याला मानसिक धक्का बसू शकतो.

ब्रेकअप करतांना तुमच्या पार्टनरचं त्यावर काय मत आहे हे नक्की जाणून घ्या. फक्त तुमच्याकडून ब्रेकअप होतोय हे सांगून निघू नका. तुमच्या पार्टनरलाही व्यक्त होऊ द्या.

ब्रेकअप के बाद..! पार्टनरला विसरण्यासाठी वापरा या ट्रीक

Click Here