स्पेसमध्ये महिला अंतराळवीर पिरिअड्ससोबत कसं डील करतात?
पिरिअड्समध्ये स्वच्छतेची काळजी घेणं गरजेचं आहे.
अंतराळात जाणाऱ्या अंतराळवीरांविषयी जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांनाच असते.
पृथ्वीच्या बाहेरच्या कक्षेत हे अंतराळवीर कसं जीवन जगतात, त्यांचे दैनंदिन कामकाज कसं असतं हा प्रश्न अनेकदा पडतो.
अंतराळात पुरुषांसोबतच महिला अंतराळवीरदेखील जातात. परंतु, एका स्त्रीच्या आयुष्यात अनेक गोष्टी घडत असतात. त्यातलीच एक गोष्ट म्हणजे पिरिअड्स.
अंतराळात महिला अंतराळवीराला पिरिअड्स आल्या तर त्या त्याच्यासोबत कसं डील करतात हे आज समजून घेऊयात.
पिरिअड्समध्ये स्वच्छतेची काळजी घेणं गरजेचं आहे. नाही तर इन्फेक्शनसारख्या समस्या निर्माण होतात.
अनेकदा महिला अंतराळवीर पिरिअड्स येऊ नयेत यासाठी हार्मोनस संप्रेशन्स (गर्भनिरोधक गोळ्या) घेणं पसंत करतात.
काही महिला अंतराळवीर गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करणं पसंत करत नाही. त्याऐवजी त्या टॅम्पोन, सॅनटरी पॅड्स किंवा मेंस्ट्रुअल कप यांचा वापर करतात. या गोष्टी डिस्पॉज करणही सोपं असतं.