ग्रहदशा कशाने बिघडते? टाळा 'या' चुका 

सगळं काही सुरळीत सुरु असताना अचानक कामं बिघडू लागतात, तेव्हा आपण म्हणतो, बहुतेक ग्रहदशा बिघडली; पण ते कशाने होते ते पाहू. 

ग्रहस्थिती आणि मनःस्थिती यांचा जवळचा संबंध आहे, जसा पौर्णिमा अमावस्या आणि भरती ओहोटीचा असतो. 

ग्रहांचा आपल्या व्यक्तिगत जीवनावर परिणाम होतो, मात्र मनःस्थिती चांगली असेल तर ग्रहस्थिती आणि परिस्थिती बदलता येते, त्यासाठी पुढील चुका टाळा. 

जर तुमचे केस आणि नखं अस्वच्छ असतील तर तुमच्या कुंडलीत रवी दोष निर्माण होईल आणि तुमची प्रगती थांबेल. 

तुम्ही अतिविचार करत असाल तर चंद्र बिघडू शकतो, त्यामुळे तुम्ही आणखी तणावग्रस्त होता आणि अपयशी होता. 

अति राग राग, शीघ्रकोपी वृत्ती यामुळे मंगळ दोष निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे चारचौघात तुमचा अपमान होऊ शकतो. 

जर तुम्ही घरातील तसेच समाजातील ज्येष्ठ मंडळींचा आदर करत नसाल तर तुमचा गुरु बिघडतो आणि करिअरमध्ये अपेक्षित यश मिळत नाही. 

अध्यात्म, पूजा पाठ यापासून तुम्ही दूर जात असाल, स्वतःच्या प्रगतीचा गर्व करत असाल तर केतू तुमच्या मनाचा ताबा घेऊन सर्वनाश करतो. 

जेव्हा तुमचा कठीण काळ सुरु असतो, तेव्हा तुमची वागणूक कशी असते याचा न्याय शनिदेव करतात आणि त्यानुसार फळ देतात. 

सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल. 

Click Here