सिनेमाच्या प्रमोशनसाठी अभिनेत्रीने ग्लॅमरस लूक केला होता.
'हाऊसफुल ५' या मल्टिस्टेरर सिनेमाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. या सिनेमात अभिनेत्री चित्रगंदा सिंगही दिसणार आहे.
सध्या चित्रगंदा 'हाऊसफुल ५' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. यासाठी तिने खास लूक केला होता.
चित्रगंदाने काळ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता. केस मोकळे सोडत तिने स्टाइल केली होती.
कानात खड्यांचे मोठे दागिने तिने घालत मेकअप करत ग्लॅमरस लूक केला होता.
याचे फोटो चित्रगंदाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत.
चित्रगंदाने फोटोसाठी खास पोझही दिल्याचं दिसत आहे.
चित्रगंदासोबत 'हाऊसफुल ५'मध्ये अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, नाना पाटेकर, श्रेयस तळपदे, जॅकलीन फर्नांडिस, संजय दत्त अशी स्टारकास्ट आहे.