घरीच तयार करा दिवाळीसाठी खास उटणं, जाणून घ्या कृती

मोजक्या साहित्यात तयार करा उटणं

दिवाळी म्हटलं की अभ्यंगस्नान आलंच. आणि उटण्याशिवाय हे अभ्यंगस्नान अपूरं आहे.

बाजारात अनेक ब्रँडचे उटणं सहज मिळतात. परंतु, दिवाळीत हे उटणं घरी करायची मज्जा काही औरच आहे. सोबतच घरी केलेल्या उटण्याचे त्वचेसाठी काही फायदेसुद्धा आहेत.

शरीरावर उटणं लावल्यामुळे त्वचेवरील मृतपेशी दूर होतात. तसंच त्वचेला आवश्यक असलेले काही पोषक घटकदेखील मिळतात.

घरच्या घरी उटणं करण्यासाठी अगदी मोजकं साहित्य लागतं.

बेसन २ चमचे, बदाम पूड १चमचा, हळद अर्धा चमचा हे कोरडं जिन्न एकत्र करावं. त्यानंतर त्यात गरजेप्रमाणे दूध किंवा गुलाबजल मिक्स करावं.

उटण्याला सुगंध येण्यासाठी आणि त्वचेचे विकार दूर करण्यासाठी यात तुम्ही नागरमोथ्याची पावडरदेखील अर्धा चमचा मिक्स करु शकता.

होममेड उटण्यामुळे त्वचा कोमल, तजेलदार होते. तसंच शरीरावरील अनावश्यक केस, डाग कमी होण्यास मदत मिळते.

अशी ओळखा भेसळयुक्त मिठाई, वापरा या सोप्या टिप्स

Click Here