मिठातील ओलसरपणा कमी करायच्या काही टीप्स आहेत त्या पाहुयात.
पदार्थाची चव वाढवणारा महत्त्वाचा घटक म्हणजे मीठ. परंतु, पावसाळ्यात बऱ्याचदा मीठ ओलसर होतं.
मीठ ओलसर होत असेल तर त्यात ४-५ तांदूळाचे दाणे टाकावेत. तांदूळ, मिठातील ओलावा शोषून घेण्यास मदत करतो.
मिठात ३-४ लवंगा टाकाव्यात.
मिठाच्या बरणीत टिश्शू पेपरचा बॉल करुन तो टाकावा.
मीठ कायम हवाबंद डब्यात ठेवावं.