पाहुण्यांसमोर घरात झुरळं फिरणं ही खूपच लाजिरवाणी गोष्ट असते
घरात झुरळं फिरताना दिसली की खूप किसळवाणं वाटतं. झुरळं फिरणं लाजिरवाणेही असते तसेच आरोग्यसाठीही हानिकारक असते
घरातील झुरळं घालवण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय केले जातात. कचरा किंवा ओल्या ठिकाणी झुरळं जास्त असतात. त्यामुळे घर स्वच्छ आणि कोरडं ठेवा.
घरात जिथे झुरळं लपलेली असतात, त्या विविध ठिकाणी लवंग ठेवण्याचा फायदा होतो. लवंग पावडर किचन सिंकच्या पाईपमध्ये स्प्रे केल्याने फायदा होतो.
पुदिना, निलगिरीचे तेल किंवा चहाच्या झाडाचे तेल झुरळांना घालवण्यासाठी फायदेशीर ठरते. पाण्यासोबत तेल थोड्या प्रमाणात मिक्स करा आणि स्प्रे करा.
साखर, पाणी आणि बेकिंग सोडा यांचे मिश्रण घरात विविध ठिकाणी उथळ भांड्यात ठेवा. साखर झुरळांना आकर्षित करते आणि बेकिंग सोडाने झुरळं मरतात.
घरात विविध ठिकाणी तमालपत्र ठेवा. तमालपत्राचा वास स्ट्राँग असतो, त्याने झुरळं पळून जातात. कपाटात, इतर जागी तमालपत्र ठेवा आणि वेळोवेळी बदला.
बोरिक अँसिड हा झुरळं पळवून लावण्याचा उत्तम पर्याय आहे. झुरळं जिथे लपतात, तिथे बोरिक पावडर टाकून ठेवा. त्याने घरातील झुरळं हळूहळ कमी होतात.