पित्त झाल्यावर करा हे सोपे घरगुती उपाय!

पित्ताचा त्रास होत असेल तर करा सोपे घरगुती उपाय

बदलती जीवनशैली, अपूर्ण झोप यामुळे अनेकांना वारंवार पित्ताचा त्रास होतो. पित्त झाल्यानंतर काही घरगुती उपायांनी हा त्रास कमी होऊ शकतो.

पित्ताचा त्रास झाला तर केळी खा. यामुळे पोटातील आम्ल निर्मितीची प्रक्रिया मंदावते. व, केळ्यातील फायबरमुळे पचनक्रियादेखील सुरळीत होते. यामुळे पित्ताचा त्रास कमी होतो.

पित्ताचा त्रास जाणवत असल्यास किंवा अस्वस्थ वाटत असेल तर ४-५ तुळशीची पाने चावून खा.

दूध प्यायल्याने पित्तामुळे होणारी पोटातील व छातीतील जळजळ कमी होते. दूध हे पित्तशामक आहे. परंतु, दूध पितांना ते  थंड किंवा त्यात साखर वा इतर पदार्थ न मिसळता प्यावे.

बडीशेप खाल्ल्यामुळेही पित्ताचा त्रास कमी होतो.

पित्ताचा त्रास झाला तर जिऱ्याचं पाणी प्या.

आयुर्वेदानुसार वेलची शरीरातील वात, कफ व पित्त यांमध्ये समतोल राखण्याचे काम करते .  पित्तापासून आराम मिळवण्यासाठी वेलचीचे दोन दाणे ठेचून ती पाण्यात टाकून उकळा. हे पाणी थंड झाल्यावर प्या. 

ब्लड शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी फॉलो करा हे नियम

Click Here