वजन वाढत नाहीये? करा हे उपाय
सध्याच्या काळात वजन कमी करण्याविषयी प्रत्येक जण व्यक्त होतो. परंतु, वजन वाढवण्याविषयी कोणीच भाष्य करत नाही.
आजही असे अनेक जण आहेत जे वजन कमी असण्याच्या समस्येने त्रस्त आहेत. म्हणूनच वजन वाढविण्यासाठी कोणते उपाय करता येतील ते पाहुयात.
वजन वाढवायचं असेल तर आहारात कॅलरीयुक्त पदार्थांचा जास्तीत जास्त समावेश केला पाहिजे.
वजन वाढविण्यासाठी तुमच्या शरीराला प्रोटीनचीही गरज असते. त्यामुळे आहारात मांस, अंडी, डाळी, दुग्धजन्य पदार्थ, सुकामेवा यांचा समावेश करावा.
ओट्स, क्विनोआ, फळे, रताळे या पदार्थांमध्ये कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण जास्त असतं. यांच्या सेवनामुळेही वजन वाढण्यास मदत मिळते.