अनेकदा डॉक्टरी उपाय करुनही दातदुखीचा त्रास कमी होत नाही.
एकदा का दात दुखायला लागले की हे दुखणं काही केल्या पाठ सोडायला तयार होत नाही.
अनेकदा डॉक्टरी उपाय करुनही दातदुखीचा त्रास कमी होत नाही. त्यामुळे असे काही घरगुती उपाय पाहुयात ज्याने दातदुखीची समस्या दूर होईल.
दात दुखत असलेल्या ठिकाणी कापूराची पूड करुन ती लावावी. तसंच जर यावेळी तोंडाला पाणी सुटत असेल तर ती लाळ गिळू नका. वेळोवेळी थुंका.
वेदनेच्या ठिकाणी कापूर ठेवल्यास आराम मिळेल. लाळ गिळू नका.
कांद्यामध्ये अँटीबॅक्टीरिअल गुणधर्म असतात. त्यामुळे ज्या ठिकाणी वेदना होत आहेत त्या ठिकाणी कांद्याचा तुकडा ठेवावा.
लसणाची पाकळी बारीक करुन त्यात मीठ मिक्स करा. हे मिश्रण दाताला लावा.
मीठाच्या पाण्याने गुळण्या केल्यानेही दातदुखीचा त्रास कमी होतो.