चामखीळ ही ह्यूमन पॅपिलोमा व्हायरसमुळे होते. या व्हायरसला HPV असंही म्हटलं जातं.
अनेक जण चामखीळच्या समस्येने त्रस्त असतात. या चामखीळ त्रासदायक नसल्या तरीदेखील त्या सौंदर्यात बाधा आणतात.
चामखीळ ही ह्यूमन पॅपिलोमा व्हायरसमुळे होते. या व्हायरसला HPV असंही म्हटलं जातं.
चामखीळला बारीक दोरा बांधून ठेवावा. यामुळे तेथील रक्ताभिसरण थांबते. व चामखीळ आपोआप गळून पडते.
लसणाची पेस्ट करुन ती चामखीळवर लावावी. यामुळे सुद्धा चामखील गळून पडते.
मानेवरील चामखीळ काढण्यासाठी एरंडेल तेल आणि बेकिंग सोडा मिक्स करुन याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट चामखीळला लावा. १ तासाने ही पेस्ट पुसून घ्या. महिनाभर हा प्रयोग करा.
केळीचं सालदेखील एक प्रभावी उपाय आहे. ज्या ठिकाणी चामखीळ झालीये त्या ठिकाणी केळीचं साल बांधून ठेवा. रात्रभर हे साल तसंच ठेवा. आठवडाभर हा उपाय करा. यामुळे चामखीळ निघून जाते.