तोंड कडू पडलंय? 

जेवण नीट जावं यासाठी आपल्या आहार पद्धतीमध्ये थोडा बदल करणं गरजेचं आहे.

आजारपणात अनेकदा तोंडाची चव जाते किंव तोंड कडू पडतं. अशावेळी आपला आवडता पदार्थही खाण्याची इच्छा होत नाही.

तोंडाची चव गेली असेल किंवा काहीही खाण्याची इच्छा होत नसेल तर अशावेळी आपल्या आहार पद्धतीत थोडा बदल करण्याची आवश्यकता असते.

तोंडाची चव परत आणण्यासाठी आहारातून मांसाहार काही काळासाठी बंद करावा. 

आहारात पालेभाज्या, फळभाज्या यांचा समावेश करावा. तसंच भरपूर प्रमाणात पाणी प्यावं.

दररोजच्या जेवणात तूपाचा आवर्जुन समावेश करावा.

रात्रीचं जागरण टाळावं आणि दररोज ७ ते ८ तासाची झोप घ्यावी. ज्यामुळे पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत मिळते.

शक्यतो पोट साफ ठेवायचा प्रयत्न करावा. वेळच्या वेळी नाश्ता, जेवण करावे.

रात्रीचे जेवण झाल्यावर बडीशोप आणि जिरे मिश्रित पाणी दररोज प्यावे.

झोपेच्या गोळ्या घेण्यापूर्वी घ्या 'ही' काळजी

Click Here