वारंवार अपचन-गॅसेसचा त्रास होतोय? 

गॅसेस, अपचन या समस्येवर घरगुती उपाय

सणवार म्हटलं की तेलकट, गोडाधोडाचे पदार्थ सहज खाल्ले जातात. परंतु, हे पदार्थ जास्त खाल्ल्यामुळे गॅसेस, अपचन यांसारख्या समस्या निर्माण होतात.

जर तुम्हाला वारंवार गॅसेस, अपचन या समस्या निर्माण होत असतील काही घरगुती उपाय करुन हा त्रास कमी करता येऊ शकतो.

अपचन, गॅसेस आणि अॅसिडिटीच्या समस्यांवर रामबाण उपाय म्हणजे ओवा. ओवा चावून खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. सुकं खोबरं आणि ओवा मिक्स करुन रात्री जेवणानंतर खाल्ल्यामुळे अपचनाचा त्रास दूर होतो.

जेवणानंतर एक चमचा जिरे चावून खाल्ल्याने गॅसेसची समस्या कमी होते.

आलं पचनक्रियेला चालना देण्याचे काम करते.आल्याचा रस आणि सैंधव मीठ जेवणापूर्वी एकत्र घेतल्याने अपचन कमी होते.

 रोज १० ते १५ काळ्या मनुकांचं नियमित सेवन करावं. यामुळे पोट साफ होतं, पित्ताचा त्रासदेखील कमी होतो.

कर्करोग टाळण्यासाठी आहारात करा या पदार्थांचा समावेश

Click Here