टाचदुखीच्या त्रासावर रामबाण उपाय!

टाचदुखी व गुडघेदुखीवरील उपाय

थंडीच्या दिवसात वातावरणात बदल झाल्यामुळे त्याचा थेट परिणाम हा आपल्या आरोग्यावर होत असतो.

एका टबात कोमट पाणी घेऊन त्यात थोडे खडे मीठ टाका आणि १०-१५ मिनिटे पाय त्यात बुडवून ठेवा. यामुळे टाचदुखीच्या त्रासात आराम मिळेल.

टाच आणि गुडघे दुखत असतील तर तीळ किंवा मोहरीच्या तेलाने मसाज करा. मसाज केल्याने त्या भागातील रक्तभिसरण सुधारते आणि सूज कमी होते.

रात्री १ चमचा मेथी दाणे पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी ते चावून खा व पाणी प्या.

रात्री झोपताना कोमट दुधात हळद टाकून प्या. हळदीमधील 'कर्ब्युमिन' दाहशामक (Anti-inflammatory) असते. ज्यामुळे शरीरावरील सूज कमी होते.

खसखसमुळे दूर होईल सांधेदुखीची समस्या!

Click Here

हिवाळ्यात शरीरात अनेक बदल होतात. त्यामुळे शरीरातील रक्ताभिसरणाची प्रक्रियादेखील मंदावली असते. परिणामी, सांधेदुखी, टाचदुखीची समस्या निर्माण होते.

जर तुमचे गुडघे प्रचंड दुखत असतील तर त्याला गरम पाण्याचा शेक द्या. यासाठी तुम्ही हिटिंग पॅडचाही वापर करु शकता.