युरीन इन्फेक्शन टाळण्यासाठी घ्या खबरदारी

UTI धोका टाळण्यासाठी करा सोपे उपाय

बऱ्याचदा पब्लिक टॉयलेटचा वापर केल्यामुळे किंवा प्रायव्हेट पार्टची योग्य काळजी न घेतल्यामुळे युरीन इन्फेक्शनची समस्या निर्माण होते.

युरीन पास करतांना जळजळ होणे, सतत टॉयलेटला जाण्याची इच्छा होणे यासारख्या समस्या युरीन इन्फेक्शन झाल्यावर सतावतात. म्हणूनच, युरीन इन्फेक्शन टाळण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी ते पाहुयात.

प्रायव्हेट पार्टची स्वच्छता करतांना सुगंधी साबण वापरणं टाळा. या सुगंधित घटकांमुळे मूत्रमार्गातील नैसर्गिक बॅक्टेरियाचं संतुलन बिघडतं. ज्यामुळे कोरडेपणा, जळजळ होणे या समस्या निर्माण होतात.

दररोज पुरेसे पाणी पिणे हा UTI प्रतिबंधाचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. पाण्यामुळे मूत्रमार्गातील सूक्ष्मजंतू बाहेर फेकले जातात. तसंच कोल्डड्रिंक्स, साखरयुक्त पेयांचं सेवन टाळा.

अनेकदा प्रवासात असतांना किंवा कामाच्या व्यापामुळे लघवी रोखून धरली जाते. परंतु, जास्त वेळ लघवी रोखल्यामुळे बॅक्टेरियाची वाढ होते. व युरीन इन्फेक्शन होतं.

आहारात जास्तीत जास्त दही, ताक, संत्री, आवळा यांचा समावेश करावा. या पदार्थांमुळे मूत्रमार्गातील बॅक्टेरियाचा नाश करण्यास मदत मिळते.

झोपेच्या गोळ्या घेण्यापूर्वी घ्या 'ही' काळजी

Click Here