होममेड रुमफ्रेशनर कसे करायचे ते पाहुयात.
पावसाळ्यात बऱ्याचदा घरात कुबट आणि दमट वास येतो.
घरातील वातावरण प्रसन्न, सुगंधी ठेवण्यासाठी महागडे रुमफ्रेशनर आणण्यापेक्षा घरीच होममेड रुमफ्रेशनर कसे करायचे ते पाहुयात.
लिंबाचे दोन भाग करुन त्यात मावतील तितक्या लवंगा पेरा आणि ज्या ठिकाणी दुर्गंधी येते तेथे ही लिंब ठेवा. लिंबू नैसर्गिकरित्या रुमफ्रेशनरचं काम करतो.
दालचिनी आणि वेलची एकत्र पाण्यात उकळा. हे पाणी थंड झाल्यावर स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि घरांच्या कोपऱ्यांमध्ये स्प्रे करा.
घरात मोगरा किंवा चमेलीची फूलं ठेवा.