दरवाज्या मागे कपडे लावता हे नक्की वाचा

अनेकदा घरात दरवाज्याच्या मागे कपडे लावण्यासाठी जागा केली जाते. अनेक कारणांमुळे दरवाज्या मागे कपडे ठेवले जातात. 

वास्तुशास्त्रात दरवाज्याला खूप महत्त्व आहे. यामुळे दरवाज्या मागे कपडे ठेवणे याेग्य नाही, असे मानले जाते. 

वास्तुशास्त्रानुसार, दरवाजा सकारात्मक उर्जा, नशीब आणि समृद्धी आणणारा मार्ग आहे. यामुळे दरवाज्या बाजूला स्वच्छता, माेकळीक ठेवावी.

कपडे लगेच वापराता यावे, साेयीसाठी म्हणून कपडे दारामागे लावले जातात. बाहेरून आल्यावर कपडे दारामागे लावण्याची सवय असते. 

काहीवेळा घरात जागा कमी असते. कपडे ओलसर असतात. या कारणांमुळे कपडे दारामागे लावले जातात. 

दारामागे कपडे लावल्याने उर्जा प्रवाह अडताे, घरातली नकारात्मकता वाढते. मनात चिडचिड व अस्वस्थता निर्माण हाेऊ शकते. 

काही वास्तू तज्ज्ञाच्या मते, मुख्य दरवाजामागे अडथळा निर्माण झाला, तर पैशांचा प्रवाह कमी हाेताे. 

दरवाज्या मागे कपडे लावले तर उर्जा अडकल्यामुळे घरातील व्यक्तींना तणाव थकवा जाणवू शकताे. 

दरवाज्या मागे कपडे लावणे टाळा. कपडे कपाटात ठेवा, हॅंगर लावण्यासाठी वेगळी साेय करा. यामुळे घरात सकारात्मकता राहील.

Click Here