मोठ्या चवीने खाल्ला जाणारा हा समोसा मुळात भारतीय पदार्थचं नाहीये.
भारतीय स्ट्रीट फूडचा जेव्हा विषय निघतो त्यावेळी समोसा आपोआपच डोळ्यासमोर येतो.
आपल्याकडे समोसा फारच आवडीने खाल्ला जातो.विशेष म्हणजे मोठ्या चवीने खाल्ला जाणारा हा समोसा मुळात भारतीय पदार्थचं नाहीये.
साधारणपणे समोसा हा पंजाबमधून आल्याचा सगळ्यांचा समज आहे. परंतु, समोश्याचं मूळ उगमस्थान हे भारत नसून मध्य-पूर्व आणि इराणमधून आलेला पदार्थ आहे.
13 व्या ते 14 व्या शतकात भारतात आलेला समोसा मुख्यत: इराणमधील पदार्थ असून त्याचं खरं नाव ‘संबोसग’ किंवा ‘संबोसा’ असं आहे. त्याकाळी समोसा तेलात तळण्याऐवजी तव्यावर शेकला जायचा.
10 व्या ते 12 व्या शतकात ज्यावेळी मध्य-पूर्वेकडील व्यापारी भारतात आले त्यावेळी ते सोबत संबोसा घेऊन आले होते.
संबोसामध्ये मुख्यता: मांस आणि सुकामेवा भरला जायचा. परंतु, भारतात हा पदार्थ लोकप्रिय झाल्यानंतर येथील लोकांनी त्यात बटाटा आणि भारतीय मसाल्यांचं मिश्रण भरुन त्याला नवीन चव दिली.
रिकाम्यापोटी प्या पुदिन्याचं पाणी, वाढलेलं पोट जाईल आत