अखंड ज्वाळांचा चमत्कार ज्वालामुखी मंदिर 

हिमाचल प्रदेशात कांग्रा जिल्ह्यात असलेलं हे मंदिर आपल्या अखंड जळणाऱ्या ज्वाळांसाठी प्रसिद्ध आहे. 

समुद्र सपाटीपासून जवळपास ६१० मीटर उंचीवर वसलेलं कांग्रा जिल्ह्यात ज्वालामुखी गावात, हे मंदिर आहे. 

पुराण कथेनुसार, देवी सतीचं जळलेलं शरीर इथे पडलं हाेतं. यामुळे येथे माता ज्वाला देवीचा वास असल्याचं मानलं जातं. 

या मंदिरात मूर्ती नाही, पण जमिनीच्या फटींमधून नैर्सगिक निळ्या - पिवळ्या ज्वाळा बाहेर पडतात. या ज्वाळा हजाराे वर्षांपासून अखंड जळत आहेत. 

या ज्वाळा प्रत्यक्षात जमिनीखालून निघणाऱ्या नैसर्गिक गॅसामुळे पेटतात. गॅस सतत बाहेर पडत असल्याने दिवा कधीही विझत नाही. 

या मंदिरात मूर्ती नाही, फक्त ज्वाळाच देवीच्या रूपात आहेत. इथे ९ वेगवेगळ्या ठिकाणी ज्वाळा प्रज्वलित आहेत. 

भारतातील ५१ शक्तिपीठांपैकी एक आहे. दरवर्षी इथे लाखाे भाविक दर्शनासाठी आहे. 

लाेकांसाठी या ज्वाळा देवीचा आशीर्वाद आहेत. शास्त्रज्ञांसाठी हे नैसर्गिक गॅसच एक रहस्यच आहे.

Click Here