सर्वोच्च भागीदारी करणाऱ्या जोड्या
टी-२० आशिया कप स्पर्धेत सर्वोच्च भागिदारीचा रेकॉर्ड विराट कोहली अन् केएल राहुलच्या नावे आहे.
२०२२ मध्ये जोडीनं अफगाणिस्तानविरुद्ध पहिल्या विकेटसाठी ११९ धावांची भागीदारी केली होती.
मोहम्मद रिझवान आणि फखर झमान जोडीनं २०२२ च्या टी-२० आशिया कप स्पर्धेत हाँगकाँगविरुद्ध दुसऱ्या विकेटसाठी ११६ धावांची भागीदारी रचल्याचा रेकॉर्ड आहे.
उमर अकमल आणि शोएब मलिक या जोडीनं २०१६ च्या टी-२० सामन्यात युएई विरुद्ध चौथ्या विकेटसाठी ११४ धावांची भागीदारी केली होती.
२०१६ च्या टी-२० आशिया कप स्पर्धेत श्रीलंकन तिलकरत्ने दिलशान आणि दिनेश चंडीमल जोडीनं पाकिस्तानविरुद्ध ११० धावांची भागीदारी रचल्याचा विक्रम आहे.
२०२२ च्या टी-२० आशिया कप स्पर्धेत सूर्यकुमार यादव -विराट कोहली जोडीनं हाँगकाँग विरुद्ध तिसऱ्या विकेटसाठी ९८ धावांची नाबाद भागीदारी केलेली.
२०२२ च्या टी-२० आशिया कप स्पर्धेत सूर्यकुमार यादव -रोहित शर्मा जोडीनं श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या विकेटसाठी ९७ धावांची भागीदारी रचली होती.
२०२२ च्या टी-२० आशिया कप स्पर्धेत श्रीलंकेच्या पथुम निसंका आणि कुसल मेंडीस जोडीन भारताविरुद्ध ९७ धावांची सलामी दिलेली.