युरिक अ‍ॅसिड वाढलंय? 'या' गोष्टी टाळा...

युरिक अ‍ॅसिड वाढल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात. 

युरिक अ‍ॅसिड हा एक रासायनिक पदार्थ आहे, जो आपल्या शरीरात प्युरीन नावाच्या घटकाच्या विघटनाने तयार होतो.

आपल्याला अन्न आणि पेयांमधून प्युरीन मिळते. हे शरीराच्या पेशींमध्येही आढळते. हे अ‍ॅसिड रक्तात विरघळते आणि मूत्रपिंडांद्वारे मूत्रमार्गे उत्सर्जित होते.

जेव्हा एखादी व्यक्ती जास्त प्युरीन असलेले पदार्थ खातो किंवा जेव्हा शरीर जास्त प्युरीन तयार करू लागते, तेव्हा मूत्रपिंड ते योग्यरित्या उत्सर्जित करू शकत नाहीत.


जेव्हा मूत्रपिंड योग्यरित्या प्युरीन उत्सर्जित करू शकत नाही, तेव्हा रक्तातील युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढते.

गोमांस, मटण आणि डुकराचे मांस यासारख्या लाल मांसामध्ये भरपूर प्युरीन असते, जे शरीरात जास्त युरिक अ‍ॅसिड तयार करते. 

बियरमध्येही प्युरीन असते आणि अल्कोहोल यकृतावर परिणाम करते. यामुळे युरिक अ‍ॅसिड उत्सर्जित करण्याची प्रक्रिया मंदावते. 

डाळी पौष्टिक असल्या तरी, हरभरा, राजमा, वाटाणे आणि मसूरमध्ये प्युरीन असते. युरिक अ‍ॅसिड वाढल्यास हे मर्यादित प्रमाणात सेवन करावे.

कोल्ड्रिंक्स, पॅकबंद ज्यूस आणि साखरेचे प्रमाण जास्त असलेल्या पदार्थांमध्ये फ्रुक्टोज असते, ज्यामुळे युरिक अॅसिडची पातळी वाढते. 

अशा परिस्थितीत प्युरिन वाढवणाऱ्या अन्नपदार्थांपासून दूर राहणे फायदेशीर आहे. युरिक अॅसिड वाढल्यावर गंभीर परिणाम होऊ सकतात.

Click Here