ब्रेकअप झालाय? दु:खातून बाहेर येण्यासाठी या गोष्टींची होईल मदत
ब्रेकअप झाल्यानंतर अनेक जण डिप्रेशनमध्ये जातात.
ब्रेकअप झाल्यानंतर अनेक जण डिप्रेशनमध्ये जातात. अनेकदा डिप्रेशनमधून बाहेर येणं प्रत्येकालाच शक्य नसतं.
ब्रेकअप झाल्यानंतर मनातून आणि डोक्यातून तुमच्या पार्टनरचा विचार पूर्णपणे काढून टाका. यामुळे तुम्हाला दु:खातून बाहेर पडायला मदत मिळेल.
ब्रेकअप झाल्यानंतर नात्यात नेमकी चूक कोणामुळे झाली याचा विचार करा. जर तुम्हाला चूक समजली तर पुन्हा त्या नात्यात अडकायचा प्रयत्न करु नका. यामुळे भावी काळातही पुन्हा तीच चूक घडायची शक्यता असते.
अनेकदा ब्रेकअप झाल्यानंतर मुलं व्यसनाच्या आहारी जातात. परंतु, यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्याचं नुकसान करुन घेताय. तुम्ही व्यसन केल्यामुळे गेलेली व्यक्ती परत येणार नाहीये हे वास्तव स्वीकारा.
दु:खात बुडून जाण्यापेक्षा त्या परिस्थितीतून बाहेर पडा. मित्रांसोबत, कुटुंबियांसोबत बोला, त्यांच्यासोबत वेळ घालवा. यामुळे तुम्हाला सावरायला मदत मिळेल.
स्वत:ला वेळ द्या.कोणताही व्यक्ती कधीच परफेक्ट नसतो, त्यामुळे परफेक्ट व्हायचा प्रयत्न उगाच करु नका. त्यापेक्षा स्वत:ला समजून घ्या. आणि शक्य होईल तितकं या दु:खातून बाहेर पडा.