जर तुम्हाला Heart Attack येतोय असं वाटत असेल तर तातडीने या गोष्टी करा.
छातीत दुखणे, घाम येणे ही हार्ट अटॅकची लक्षणं आहेत.
सर्वात आधी हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यासाठी अॅम्ब्युलन्सला कॉल करा. किंवा जवळच्या व्यक्तीला कॉल करून तशी अरेंजमेंट करायला सांगा.
ज्या व्यक्तीला हार्ट अटॅकची लक्षणं आहेत त्याला ४५ डिग्री अँगलमध्ये बसवा.
हार्ट अटॅकची लक्षणं दिसणाऱ्या व्यक्तीला पूर्ण आडवं झोपवू किंवा खूर्चीत उभं बसवू नका.
त्या व्यक्तीला तातडीने Disprin ही गोळी द्या.
हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत त्या व्यक्तीशी बोलत राहा. तिला जागं ठेवण्याचा प्रयत्न करा.