पचनक्रिया वाढवणारे ५ सूप, नक्की ट्राय करा या रेसिपी
आज असे ५ सूप्सचे प्रकार पाहुयात ज्यामुळे तुमची इम्युनिटी वाढेल.
चुकीची आहारपद्धती, व्यायामाचा अभाव या सगळ्याचा शरीरावर वाईट परिणाम होत असतो.
आज असे ५ सूप्सचे प्रकार पाहुयात ज्यामुळे तुमची इम्युनिटी तर वाढेलच.पण, त्यासोबतच पचनक्रियाही सुरळीत होईल.
पालक पनीर सूप-तेलावर कांदा आणि लसूण परतून त्यावर पालकची पेस्ट टाका. थोडे किसलेले पनीर टाकून हे मिश्रण चांगले उकळवून घ्या. पालकामुळे शरीराला लोह मिळण्यास मदत मिळते.
लाल भोपळ्याचे तुकडे, कांदा, लाल मिरच्या, आले, लसूण पेस्ट, भाजलेले जिरे, हे सर्व १० मिनिटे शिजवा. त्यानंतर हे मिश्रण थंड झाल्यावर त्याची पेस्ट करा. गरजेप्रमाणे त्यात पाणी घालून उकळवा.
टोमॅटो सूप- चिरलेला कांदा, टोमॅटो उकळत्या पाण्यात टाका. नंतर लसूण, अक्रोडचे काप, भाज्या टाका. एक उकळी आल्यानंतर हे मिश्रण चांगले घोटून घ्या. यामध्ये मिरपूड, दालचिनीची पावडर टाका.
गाजर वाफवून त्याची पेस्ट करा. त्यामध्ये कोथींबीरीचे देठ, लिंबाचा रस, किसलेले आले टाका. त्यानंतर सोईनुसार पाणी टाका व छान उकळी येईपर्यंत गरम करा. त्यानंतर कोमट झाल्यावर सूप प्या.
व्हेजिटेबल स्टॉक घेऊन त्यात मिरपूड, लवंग टाका. त्यानंतर त्यात कोथिंबीरची पानं आणि देठ टाका. सोबतच लिंबाचा रसही मिक्स करा. या मिश्रणाला छान उकळी आली की गरमगरम प्या.
शरीर देतंय तुम्हाला संकेत! 'या' समस्यांमुळे येतो डोळ्यासमोर अंधार