मुलांची ग्रोथ होण्यासाठी झटपट होणारे नाश्त्याचे प्रकार
मुलांना आवडतील आणि पौष्टिक असतील असे नाश्त्याचे प्रकार
मुलांच्या योग्य वाढीसाठी त्यांच्या आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करणं अत्यंत गरजेचं आहे.
अनेकदा कितीही छान पदार्थ केले तरीदेखील मुलं काही केल्या ते पदार्थ खात नाहीत. म्हणूनच, मुलांना आवडतील आणि पौष्टिक असतील असे काही नाश्त्याचे प्रकार पाहुयात.
ओट्स पोहा- ओट्स थोडेसे भाजून त्यात आवडीनुसार भाज्या, किरकोळ मसाल मिक्स करुन पोहे तयार करता येतात. हे पोहे पचायला हलके आहेत.
मुलांचं पोट भरावं आणि ते दिवसभर एनर्जेटिक रहावेत यासाठी तुम्ही त्यांना स्मुदी देऊ शकता. मुलांना आवडणारी फळं दह्यासोबत छान ब्लेंड करुन त्याची स्मुदी तयार करता येईल.
ज्यांच्या घरी अंडी खाल्ली जातात. ते अंडा भुर्जी, ऑम्लेटदेखील मुलांना देऊ शकतात.
मुगाच्या डाळीचा चिला सध्या टॉप ट्रेंडिंगवर आहे. यात प्रोटिन आणि फायबरचं प्रमाण जास्त असतं. मुगाच्या चिल्ल्यामध्ये तुम्ही काही भाज्या सुद्धा अॅड करु शकता.