स्त्रियांना दारु लवकर का चढते या मागचं कारण पाहुयात.
मद्यपान करणं शरीरासाठी कितीही घातक असलं तरीदेखील आज अनेक पार्टी, कार्यक्रमांमध्ये लोक सर्रास मद्यप्राशन करतात.
पुरुषांसोबतच अनेक ठिकाणी महिलादेखील ड्रिंक करतात. मात्र, पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना दारुची नशा लवकर चढते. म्हणूनच, स्त्रियांना दारु लवकर का चढते या मागचं कारण पाहुयात.
स्त्रियांना दारु चढण्यामागे काही वैज्ञानिक कारणे आहेत. स्त्रियांची शरीररचना हे दारु चढण्यामागचं एक महत्त्वाचं कारण आहे.
एका अभ्यासामध्ये पुरुष व स्त्रियांना समान मद्य दिलं. यावेळी महिलांच्या शरीरात सुरुवातीच्या टप्प्यामध्ये अल्कोहोल विघटन करण्यासाठी जबाबदार असलेले एंजाइम्स हे पुरुषांच्या तुलनेत कमी एक्टिव्ह होते.
दारू शरीरात जाते तेव्हा एंजाइम्स मेटाबोलाईज करण्यासाठी काम करतात. महिलांमध्ये हे एंजाइम्स कमी प्रमाणात एक्टिव्ह असल्यामुळे दारूचा एक भाग थेट रक्तामध्ये पोहोचतो.
दारूचा प्रभाव केवळ रक्तापर्यंत मर्यादित राहत नाही. तर त्याचा परिणाम मेंदूवरही होतो. संशोधनानुसार, महिलांचा मेंदू पुरुषांपेक्षा अल्कोहोलच्या परिणामांवर अधिक लवकर रिएक्शन देतो.
जशी दारू रक्ताद्वारे मेंदूपर्यंत पोहोचते तेव्हा महिलांच्या न्यूरोलॉजिकल सिस्टीमना ते लवकर जाणवतं. त्यामुळेच महिलांना पुरुषांपेक्षा लवकर दारू चढते.