कोणत्याही पदार्थाचं अतिसेवन करणं शरीरासाठी घातकच आहे.
साखर आणि मीठ यांचं सेवन कमी करा असा सल्ला डॉक्टर कायमच देतात.
शरीरात मीठ आणि साखरेचं प्रमाण वाढलं तर कोणत्या अवयवावर त्याचा दुष्परिणाम होतो ते पाहुयात.
हृदयासंबंधित तक्रारी असलेल्या व्यक्तींनी अतिरिक्त प्रमाणात साखर-मीठाचं सेवन केलं तर त्यांच्या हृदयाशी निगडीत समस्येत वाढ होण्याची शक्यता असते.
ज्यांना शुगरचा त्रास आहे त्यांनीदेखील साखरेचं सेवन करु नये. यामुळे ब्लडप्रेशर वाढण्याची शक्यता असते.
अतिरिक्त मीठ आणि साखरेचं सेवनकेल्यामुळे किडनीवरही त्याचा परिणाम होतो.
हातापायाला सूज येत असेल तर मीठाचं सेवन करणं टाळावं.