गोड पदार्थ जेवणानंतर खावेत की आधी?

गोड पदार्थ खाण्याची योग्य वेळ कोणती?

गोड पदार्थ खाणं कोणाला आवडत नाही? कोणताही सणवार असला की प्रत्येकाच्या घरात आवर्जुन गोड पदार्थ केले जातात. 

गोड पदार्थ खाण्याचे आज अनेक शौकिन आहेत.मात्र, गोड पदार्थ जेवणानंतर खावा की आधी खावा हा प्रश्न अनेकांना पडतो.

अनेक जणांना जेवणानंतर गोड पदार्थ खायला आवडतात. तर, काहींच्या मते, जेवणापूर्वीच गोड पदार्थ खावेत.

गोड पदार्थ खाण्याची योग्य वेळ जेवणानंतरच आहे. कारण, जेवणानंतर गोड पदार्थ खाल्ला तर रक्तातील साखरेचं प्रमाण धिम्या गतीने वाढतं.

जेवणापूर्वी जर गोड पदार्थ खाल्ला तर रक्तातील साखरेचं प्रमाण झपाट्याने वाढतं.  तसंच रिकाम्या पोटी गोड खाल्लं तर इन्सुलिनची निर्मितीही झपाट्याने होते. ज्यामुळे डायबिटीसचा धोका संभवतो.

जेवणानंतर जर तुम्ही गोड खात असाल तर तेदेखील प्रमाणात खा. एक किंवा दोनच घास गोड पदार्थाचे खा.

गोड खायची इच्छा झाली मिठाईच्याऐवजी गुळ, मध यांचं सेवन करा.

हिरवी मिरची कच्ची खावी की तळून? 

Click Here