पेन किलर गोळ्यांचे शरीरावर होणारे परिणाम
आजकाल किरकोळ आजारांवरही सर्रास पेनकिलरची औषधे घेतली जातात. मात्र, तात्पुरता आराम देणारी ही औषधे शरीरावर दिर्घकाळासाठी गंभीर परिणाम करतात.
पेनकिलर घेतल्यामुळे त्याचे शरीरावर विपरित परिणाम होतात. म्हणूनच, या औषधांमुळे कोणत्या समस्या निर्माण होतात ते पाहुयात.
प्रमाणापेक्षा जास्त पेन किलर घेतल्यामुळे आपण वयस्क दिसू लागतो.
कधीही रिकाम्यापोटी पेन किलर घेऊ नये. यामुळे किडनी तसंच यकृतासंबंधीच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.
पेन किलरच्या गोळ्या घेतल्यामुळे निद्रानाश, अस्वस्थता, अचानकपणे घाबरल्यासारखं होणं या समस्या उद्भवतात.
पेन किलर घेतल्यामुळे रक्तदाबही कमी होऊ शकतो.