दररोजच्या जेवणात करा सैंधव मीठाचा वापर अन् पाहा फायदे
सैंधव मीठ आजकाल फक्त उपवासाच्या पदार्थांमध्ये पाहायला मिळतं.
पूर्वीच्या काळी प्रत्येक घरात सैंधव मीठ वा जाड मीठ वापरलं जायचं. मात्र, कालांतराने या मीठाची जागा बारीक मिठाने घेतली आहे. आज घराघरात आयोडीनयुक्त मीठ पाहायला मिळतं.
सैंधव मीठ आजकाल फक्त उपवासाच्या पदार्थांमध्ये पाहायला मिळतं. परंतु, हे मीठ रोजच्या आहारात समाविष्ट केलं तर त्याचे असंख्य फायदे शरीराला मिळतील.
सैंधव मीठामध्ये इलेक्र्टोलाइटसचे प्रमाण सामान्य मीठापेक्षा कमी असते. यामुळे हाडांचा ठिसूळपणा, सांधूदुखी या समस्या दूर राहण्यास मदत होते.
ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे अशा व्यक्तींना नियमितपणे सैंधव मीठ खावे. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
सैंधव मीठ खाल्ल्यास हृदयरोगाची समस्या दूर होण्यास मदत होते.