नारळपाणी ठरू शकतं प्राणघातक?

नारळ पाणी पिण्याआधी नक्की तपासून पाहा ही गोष्ट

नारळपाणी पिण्याचे किती फायदे आहेत हे काही वेगळं सांगायची गरज नाही. 

नारळपाणी पिण्याचे जसे फायदे आहेत. तसेच त्याच्या अतिरिक्त सेवनाचे काही तोटे सुद्धा आहेत.

अनेकदा नारळपाणी पितांना आपण ते तपासून घेत नाही. परंतु, जर नारळाला बाहेरुन तडा गेला असेल तर आतलं पाणी खराब झालेलं असतं. ज्यामुळे शारीरिक समस्या उद्भवू शकतात.

दुषित नारळ पाणी पिण्याचे काही धोकादायक परिणाम आहेत. यात सगळ्यात महत्त्वाचा धोका म्हणजे श्वास घेण्यास त्रास होणे.

दूषित नारळ पाण्याचा फुफ्फुसांवर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत दाब येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात

शिळे किंवा खराब झालेले नारळ पाणी पिल्याने बॅक्टेरिया शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे उलट्या, जुलाब आणि पोटदुखी यांसारखी अन्न विषबाधेची लक्षणे दिसू लागतात.

सर्वात धोकादायक परिस्थिती तेव्हा उद्भवते जेव्हा बुरशीमुळे खराब झालेल्या पाण्यात 3-नायट्रोप्रोपियोनिक अॅसिड तयार होते व ते मेंदूवर परिणाम करते.

दही की ताक? आरोग्यासाठी सर्वाधिक गुणकारी काय?

Click Here