ऋतुमान बदललं की त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. यात खासकरुन हिवाळ्यात आपल्या आहाराची विशेष काळजी घेतली पाहिजे.
हिवाळ्यामध्ये वातावरणात अनेक बदल होतात. ज्याचा परिणाम आपल्या पचनसंस्थेवर होत असतो.
हिवाळ्यात भेंडीची भाजी खाण्याविषयी अनेक समज-गैरसमज आहेत. काहींच्या मते ही भाजी खाऊ नये. तर, काहींच्या मते हिवाळ्यात भेंडी खाणं फायद्याचं आहे.
भेंडीची भाजी खाण्याचे अनेक फायदे आहेत.भेंडी खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते, रक्तातील साखर नियंत्रणात येते, हृदयासंबंधीच्या तक्रारी दूर होतात. तसंच त्वचा आणि डोळ्यांचं आरोग्यही चांगलं राहतं.