बऱ्याचदा अन्नपचन नीट न झाल्यामुळे किंवा जागरण झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी अपचन, अॅसिडीटी वा अजीर्ण होण्याची समस्या निर्माण होते.
जर वारंवार तुम्हाला अपचनाची समस्या जाणवत असेल तर आल्याच्या तुकड्यावर लिंबाचा रस, सैंधव मीठ टाकावं. त्यानंतर हा आल्याचा तुकडा हळूहळू चघळावा. यामुळे अपचनाचा त्रास दूर होतो.
लिंबाच्या रसात आल्याचे तुकडे, जरासा गूळ आणि सैंधव मीठ टाकून वाटावे आणि ही चटणी चवीने खावी. यामुळे पोटाच्या समस्या दूर होतात.
मातीच्या भांड्यात लिंबाचे तुकडे, सैंधव मीठ मिक्स करुन हे भांडं उन्हात ठेवावं. लोणचं छान मुरल्यानंतर दररोज जेवणानंतर एक लिंबाची फोड खावी. यामुळे अन्नपचन नीट होतं.
तुळशीच्या पानांचा रस काढून त्यात दहा ग्रॅम सुंठ मिक्स कराव. त्यानंतर याच्या लहान गोळ्या कराव्यात. या गोळ्या दिवसातून ३ वेळा खाव्यात.
सतत मानसिक ताण येतोय? मग करा ओव्याच्या पाण्याचे सेवन