तुमचा mood अचानक खराब होतोय?
Vitamin D हे हाडांच्या आरोग्यासाठी गरजेचं आहे हे सगळ्यांनाच ठावूक आहे. परंतु, याच Vitamin D मुळे मनाचंही आरोग्य राखलं जातं.
जर तुमच्या शरीरात Vitamin D ची कमतरता असेल तर अनेक मानसिक समस्या डोकं वर काढतात. म्हणूनच, Vitamin D जर कमी असेल तर कोणत्या समस्या उद्भवतात ते पाहुयात.
जर शरीरात Vitamin D कमी असेल तर चिडचिड होणे, नैराश्य, उदासीनता, लो मूड यांसारख्या तक्रारी जाणवतात.
Vitamin D च्या कमतरतेमुळे झोपेचं चक्रही बिघडतं. ज्यामुळे अस्वस्थता वाढते.
Vitamin D कमी असेल तर सकाळी उठल्यावर थकल्यासारखं वाटतं. दिवसभर कोणत्याच कामात मन लागत नाही.
Vitamin D ची कमी पूर्ण करण्यासाठी आहारात लोणी, तूप,दूध, बदाम यांसारख्या पदार्थांचा समावेश करा.तसंच सकाळी २० मिनिटे उन्हात बसा.