हिवाळ्यात वातावरणातील गारठ्यामुळे सर्दी, खोकला, ताप असे किरकोळ आजार सारखेच उद्भवत असतात.
हिवाळ्याच्या दिवसात वातावरणात गारठा निर्माण झालेला असतो. ज्याचा परिणाम शरीरावर होतो.
हिवाळ्यात वातावरणातील गारठ्यामुळे सर्दी, खोकला, ताप असे किरकोळ आजार सारखेच उद्भवत असतात. त्यामुळे शरीराला उष्ण ठेवणं गरजेचं असतं.
शरीरात उष्णता निर्माण करणारे अनेक पदार्थ आहेत. त्यातलंच एक म्हणजे आलं. हिवाळ्यात आले खाण्याचे असंख्य फायदे आहेत.
आल्यातील पोषणतत्त्व एंझाइम उत्तेजित करण्याचे काम करतात, यामुळे अन्नाचे पचन होण्यास मदत मिळते.
आल्यातील पोषणतत्त्वांमुळे अॅसिडिटी आणि पोट फुगण्याची समस्या कमी होते. कारण गॅस्ट्रिक मोटिलिटी सुधारते म्हणजे पोटातील स्नायूंची हालचाल होऊन अन्नाचे विघटन होण्यास मदत मिळते.
आल्यामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत. यातील जिंजरोल नावाच्या कम्पाउंडमुळे सांध्यांवरील सूज कमी होण्यास मदत मिळते.
आल्यातील अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-वायरल कम्पाउंडमुळे शरीराचे संरक्षण होते.