चेहऱ्यावर पिंपल्स येतायेत? वापरा बदाम तेल

बदाम खाण्याचे जितके फायदे आहेत. तितकंच त्याचं तेलही शरीरासाठी फायद्याचं आहे.

बदाम खाल्ल्यामुळे स्मरणशक्ती चांगली होते हे सगळ्यांनाच ठावूक आहे. त्यामुळे खासकरुन लहान मुलांना कायम बदाम खाण्याचा सल्ला दिला जातो.

बदाम खाण्याचे जितके फायदे आहेत. तितकंच त्याचं तेलही शरीरासाठी फायद्याचं आहे.

बदामाच्या तेलात व्हिटामिन ई, बायोटीन आणि अँटी ऑक्सिडेंट्स मुबलक प्रमाणात असतात. ज्यामुळे त्वचेचा पोत सुधारतो.

बदामाच्या तेलाने चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करावा. यामुळे डार्क स्पॉट्स, सनबर्न यांसारख्या समस्या दूर होतात.

बदामाचं तेल नियमितपणे केसांना लावावं. यामुळे केस मजबूत होतात. तसंच केसगळतीची समस्या दूर होते.

बदाम तेलामध्ये ओमेगा -३ फॅटी अॅसिड, व्हिटामिन ई असल्यामुळे हृदयाचं आरोग्य यामुळे चांगलं राहतं. शरीरातील चांगलं कोलेस्ट्रॉल वाढण्यास बदाम तेलाची मदत मिळते.

बदामाच्या तेलामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत मिळते.

दिवसभर एनर्जेटिक रहायचंय? तर प्या शेवग्याच्या पानांचं पाणी 

Click Here