तुळशीच्या मंजिरांमुळे कमी करा शरीरातील एक्स्ट्रा फॅट

फक्त तुळशीची पानचं नव्हे तर मंजिरादेखील आहेत गुणकारी

भारतीय संस्कृतीमध्ये तुळशीला असलेलं अनन्यसाधारण महत्त्व सगळ्यांनाच ठावूक आहे.

प्रत्येक शुभकार्यात तुळशीपत्राचा वापर केला जातो. तुळशीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे आहेत.त्याच सोबतच त्याच्या मंजिराही तितक्याच गुणकारी आहे.

तुळशीच्या मंजिरांमध्ये एँटीबायोटिक, एँटी व्हायरल, एँटीबॅक्टेरियल गुण आहेत. सोबतच त्यात फायबर, ओमेगा-३ यांसारखे फॅटी अॅसिड आहे.

मंजिरांच्या काढ्याचं सेवन केल्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे वातावरण बदलामुळे होणाऱ्या सर्दी-खोकल्याचा त्रास कमी होतो.

बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर रोज सकाळी भिजवलेल्या मंजिरांच्या पाण्याचं सेवन करावं.

अनेकदा स्ट्रेस लेव्हल वाढली की अनहेल्दी पदार्थ खाण्याची इच्छा होते. तसंच कॉर्टिसॉलचं प्रमाणही वाढतं. अशावेळी मानसिक ताण कमी करण्यासाठी तुळशीच्या मंजिरांचा चहा प्यावा.

तुळशीच्या मंजिरांमुळे ब्लड शुगरची लेव्हल नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.

तुळशीच्या मंजिरा पाण्यात उकळून हे पाणी गाळून प्यावं. यामुळे वेट लॉस लवकर होतो.

तांदळाच्या पिठाने बनवा चमकदार फेस पॅक

Click Here