ऊसाच्या रसामुळे दूर होतील अनेक शारीरिक समस्या
उन्हाळा सुरु झाला की प्रत्येकाची पावलं आपोआपच रसवंती गृहाकडे वळतात.
ऊसाचा रस पिण्याचे अनेक फायदे आहेत. ऊसाच्या रसात काळं मीठ घालून त्याचं सेवन केलं तर पचनशक्ती सुधारते.
ऊसाच्या रसामुळे लिव्हरचं आरोग्य चांगलं राहतं.
ऊसाचा रस हा नैसर्गिक ग्लुकोजचा उत्तम स्रोत आहे. त्यामुळे अशक्तपणा जाणवत असेल तर ऊसाचा रस प्यावा.
ऊसाचा रस प्यायल्यामुळे पित्त, अॅसिडिटी, गॅस यांसारख्या समस्या दूर होतात.
ऊसाचा रस हा ७०–७५% पाण्याने भरलेला असतो. त्यात ग्लुकोज, खनिजे, व्हिटॅमिन्स असतात. त्यामुळे या रसामुळे शरीरातील पाण्याची पातळी कायम राखण्यास मदत मिळते.